भारताची सरगम कौशल ‘मिसेस वर्ल्ड’ किताबाची मानकरी

0
24

लास वेगास: भारताची ‘मिसेस वर्ल्ड’चा किताब जिंकण्याची 21 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. देशाची सरगम कौशल मिसेस वर्ल्ड 2022 ची विजेती ठरली. या सौंदर्यस्पर्धेचं आयोजन अमिरेकेत करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांनीही हजेरी लावली होती. तब्बल 21 वर्षांनंतर जेव्हा मिसेस वर्ल्डचा किताब भारताच्या नावावर झाला, तेव्हा सरगम कौशल मंचावर भावूक झाली होती. सोशल मीडियावर सरगमचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय.