Tuesday, April 30, 2024

साताऱ्यात अजित पवारांचे ‘घड्याळ’ नाहीच… भाजपची उदयनराजे भोसले यांना उमेदवारी…

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतत निवडून येणारी साताऱ्याची जागा महायुतीत भाजपने राष्ट्रवादीकडून बळकावली आहे. भाजपने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. सातारा मतदारसंघात १९९९ पासून एकत्रित राष्ट्रवादीने विजय मिळविला होता. यामुळेच महायुतीतील जागावाटपात ही जागा मिळावी, अशी अजित पवार यांची मागणी होती. साताऱ्याच्या जागेवर आमचाच दावा असल्याचे प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे सतत सांगत होते.

भाजप उमेदवारांच्या १२व्या यादीत साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles