भाजपला घरचा आहेर..राज्यपाल रोखठोक,भाजप नेत्यांवरही ईडी, सीबीआयची छापेमारी व्हावी

0
1025

रायपूर: मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक पुन्हा एकदा आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी थेट उपराष्ट्रपतीपदाबाबत विधान केलं आहे. चूप राहण्याच्या बदल्यात मला केंद्र सरकारने उपराष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती. मात्र, मी त्यांना सांगितलं. मी असं करू शकत नाही. मला जे वाटतं ते मी जरूर बोलतो. त्यासाठी मला काहीही गमवावं लागलं तरी बेहत्तर. मात्र, जगदीप धनखड यांची उपराष्ट्रपतीपदाची निवड योग्यच होती, असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलं आहे. यावेळी सत्यपाल मलिक यांनी भाजप नेत्यांवर ईडी, सीबीआयची छापेमारी करण्याची मागणी केली.झुंझुनूं येथे आल्यावर मीडियाशी संवाद साधताना सत्यपाल मलिक बोलत होते. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक गोष्टीचा सपोर्ट करतो. सोबतच मी माझं मतही व्यक्त करत असतो. म्हणजे मी मोदी सरकारच्या विरोधात आहे, असा त्याचा अर्थ नाही, असं सत्यपाल मलिक यांनी स्पष्ट केलं.