सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इमारतीवर बाबुर्डी घुमट गावाचा विसर.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विद्यापीठाच्या समोर गावकऱ्यांचा ठिय्या आंदोलन करून गावाचा उल्लेख करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)- मौजे बाबुर्डी घुमट येथे नव्याने बांधण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इमारतीवर बाबुर्डी घुमट गावाच्या नावाचा उल्लेख नसून गावाचा उल्लेख करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष शेखर भाऊ पंचमुख यांच्यावतीने करण्यात आली व विद्यापीठाच्या इमारतीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी सामाजिक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष शेखर भाऊ पंचमुख समवेत अशोक परभने, माजी सरपंच अशोक येवले, शाहरुख पठाण, परसराम तुपेरे, प्रवीण पंचमुख, विठ्ठल परभने, सचिन बोठे, राजू चव्हाण, प्रवीण गांगर्डे, अनिल भोसले, संकेत बोठे, सचिन परभने आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, नव्याने बांधण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्राच्या इमारतीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्र नाव देण्यात आलेले आहे. त्यामध्ये बाबुर्डी घुमट गावाच्या नावाचा उल्लेख करण्यात यावा याकरिता अनेकदा निवेदने दिलेली आहे. परंतु अद्यापही गावाचं नाव लावण्यात आलेला नसून त्यामुळे विद्यापीठाच्या इमारतीसमोर ठिया आंदोलन करण्यात आले. बाबुर्डी घुमट गावामध्ये ८३ एकर जमीन विद्यापीठासाठी प्रदान केलेली आहे. त्यामध्ये आमच्या गावाचे बहुमोल योगदान आहे. सदरील विषय हा ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा व प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे लवकरात लवकर विद्यापीठाच्या नवीन इमारतीवर गावाच्या नावाचा उल्लेख करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Home नगर जिल्हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इमारतीवर बाबुर्डी घुमट गावाचा विसर ,गावकऱ्यांचा ठिय्या आंदोलन