साबण, पावडर शिवाय 30 सेकंदात हटवा कपड्यावरील शाईचे डाग …व्हिडिओ

0
759

खाद्या वेळेस जेवणाचे डाग किंवा रंगांचे डाग काढणं तरी सोपं असतं पण शाईचे डाग पडलेले शर्ट स्वच्छ करणं ही अत्यंत मेहनतीची जबाबदारी ठरते. पण आज आपण एका असा भन्नाट जुगाड पाहणार आहोत ज्यामुळे इन मिन मोजून ३० सेकंदात आपण शाईचे डाग पडलेला शर्ट धुवून लक्ख करू शकता.

@masterinhacks या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शाईचे डाग काढण्यासाठी कुठल्याच साबण- पावडरची गरज लागणार नाही. तुम्हाला फक्त सॅनिटायजर घेऊन ब्रशला लावून शाईच्या रेघोट्यांचा भाग घासून स्वच्छ करायचा आहे. यानंतर तुम्ही थंड पाण्याखाली धरून हा शर्ट स्वच्छ धुवून घ्या.