SBI Car Loan…मारुती, हुंदाईसह 10 कंपन्यांच्या कार बुकींग व कर्जावर बंपर ऑफर!

1
941

SBI Car Loan
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने तुमच्यासाठी बंपर ऑफर आणली आहे. एसबीआयच्या या ऑफरच्या माध्यमातून मारुती सुझुकी, ह्युंदाई, रेनॉल्ट, टाटा मोटर्ससह 10 मोठ्या कंपन्यांची कार खरेदी सोपी झाली आहे. फक्त मोबाईल वरील काही मिनिटांच्या खेळीनंतर तुम्हाला तुमची आवडती कार बूक करता येईल. एसबीआय योनो अ‍ॅपच्या माध्यमातून कार बुकिंगवर ग्राहकांवर अनेक आकर्षक ऑफर्सचा वर्षाव करण्यात आला आहे. ग्राहकांना प्रक्रिया शुल्कात सवलत देण्याबरोबरच कमी व्याजदराने कर्जही उपलब्ध होणार आहे. एसबीआयने ट्विट करत ही माहिती दिली आहे. तुम्ही सर्व नियम आणि अटींमध्ये फिट बसत असाल तर तुम्हाला कर्जासाठी बँकेच्या शाखेत जाण्याचीही गरज नाही आणि तुम्ही घरबसल्या एसबीआयच्या योनो मोबाईल अ‍ॅप च्या आधारे कर्जासाठी अर्ज करू शकता.

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे. बँकेने ट्विट केले की, “Ride with Pride!” योनोच्या माध्यमातून तुमच्या ड्रीम कार बुक करण्याच्या खास ऑफरचा आनंद घ्या. यासाठी एसबीआयचे योनो अ‍ॅप डाऊनलोड करा.

हे सुध्दा वाचा…

Google… स्मार्ट फोन मध्ये आता Call Record करता येणार नाही…थर्ड पार्टी ॲप्सना बंदी

1 COMMENT

Comments are closed.