SBI Green Car Loan स्टेट बँक ऑफ इंडिया इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देत आहे. त्यासाठी बँकेने खास आपल्या ग्राहकांसाठी ग्रीन कार योजना तयार केली आहे. या योजनेंतर्गत इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना कर्जावर 0.20 टक्क्यांची सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर तुम्हाला प्रोसेसिंग फी देखील द्यावी लागणार नाहीये. या योजनेंतर्गत तुम्हाला इलेक्ट्रिक कारच्या खरेदीसाठी प्रचलित व्याजदरापेक्षा 0.20 टक्के कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. हे कर्ज तुम्हाला आठ वर्षांत परत करावे लागेल. बँकेच्या याजनेंर्गत तुम्हाला इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी 100 टक्के कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच प्रोसेसिंग फी देखील देण्याची गरज नाही. एसबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून 7.25 ते 7.60 टक्के दराने कर्ज मिळत आहे.
LED Bulb..लाईट गेल्यावरही तीन चार तास उजेड देणारे एलईडी…ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोठा डिस्काउंट