video: रीलसाठी महिला शिक्षिकेने वर्गातच केला डान्स, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले चौकशीचे आदेश

0
91

एका महिला शिक्षिकेला रील बनवणं खूप महागात पडलं आहे. कारण त्यांनी चक्क वर्गात डान्स केला आहे. ज्यामुळे त्याच्यावर अनेक लोक टीका करत आहेत. शिवाय हे रील त्यांनी विद्यार्थ्यांना शूट करायला सांगितल्याचा आरोपही शिक्षिकेवर करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील एका शाळेतील हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला शिक्षिका वर्गात डान्स करताना दिसत आहे. विद्येच्या मंदिरात शिक्षिकेने केलेला असा डान्स पाहिल्यानंतर अनेकांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देखील दिले आहेत.