मंत्री गडाखांच्या पीए वर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटकेत

0
1326

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री ( ता. 22 ) जीव घेणा हल्ला झाला होता.अहमदनगर – राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री ( ता. 22 ) जीव घेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची वेगात चक्रे फिरवत गावठी पिस्तुलाने गोळीबार करणाऱ्या एका आरोपीला 24 तासात अटक केली. नितीन विलास शिरसाठ ( वय 29, रा. वांजोळी, ता. नेवासे ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली