राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वातील गट भाजपाबरोबर सरकारमध्ये सहभागी झाला. यानंतर या बंडाबाबत अनेक तर्कवितर्क लावले गेले. यानंतर आता फुटीनंतर पडलेले राष्ट्रवादीतील शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते रविवारी (१ ऑक्टोबर) पुण्यातील जुन्नर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “जे लोक भारतीय जनता पार्टीबरोबर आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असू शकत नाहीत. आज कुणी भाजपाबरोबर जाण्याची भूमिका घेऊन तडजोड करण्याचा विचार करत असतील, तर तो विचार आम्ही स्वीकारणार नाही. त्याचं कारण कालच्या निवडणुकीत, मग ती विधानसभा असो की लोकसभा, लोकांना भाजपाच्या विरोधात मतदान केलं आहे.”