Share Market LIC IPO
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच आयपीओ हा 4 मे रोजी लाँच केला जाणार आहे.
LIC मधील पाच टक्के भागभांडवल किंवा 31.6 कोटी शेअर्सची विक्री यापूर्वी मार्चमध्ये होणार होती परंतु भू-राजकीय तणावामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया कडे नवीन कागदपत्रे दाखल न करता LIC चा IPO आणण्यासाठी सरकारकडे 12 मे पर्यंत वेळ मागितला होता. आता 4 मे या तारखेवर शिक्कामोर्तब झाले आहे.
सरकार LIC मधील 3.5 टक्के शेअर्स 21,000 कोटी रुपयांना विकणार आहे, हे नियामक मान्यतेच्या अधीन असेल.