जिल्ह्यातील लष्करी जवान कर्तव्य बजावताना शहीद, बातमी कळताच आजीने सोडले प्राण.

0
1024

शेवगाव तालुक्यातील राक्षी इथे जवान सचिन रामकिसन साळवे (वय ३३) यांचा आसाममधील गुवाहाटी इथे कर्तव्यावर असताना बुधवारी मृत्यू झाला. याची माहिती गावाकडे कळविण्यात आली. या धक्क्याने त्यांची आजी (आईची आई) गंगूबाई सुखदेव जगधने (वय ७०) यांचे निधन झाले. आजीवर कालच अंत्यसंस्कार करण्यात आले असून जवान सचिन यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सचिन यांचे बंधू प्रवीण हेही लष्करात आहेत. त्यांनाही या घटनेचा त्रास झाल्याने रुग्णालयात न्यावे लागले. राक्षी येथील सचिन आणि प्रवीण हे दोघेही भाऊ २०११ पासून लष्करी सेवेत आहेत. सचिन गुवाहाटी येथे कार्यपत होते. तर प्रवीण जम्मू-काश्मीरमधील नवसारा येथे कार्यरत आहेत. प्रवीण सध्या सुट्टीवर गावी आलेले आहेत.सचिन यांचे प्राथमिक शिक्षण राक्षी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. महाविद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे घेतल्यानंतर ते लष्करात २०११ ला भरती झाले.