लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभेत ठीक-ठिकाणी भेटी देत आहेत. केंद्राच्या तसेच राज्याच्या विविध योजनांची माहिती देखील ते या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत आहेत.
नुकतेच शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांना शरद पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री विखे म्हणाले की, सुनेत्र पवार यांच्यावरती केलेले वक्तव्य आदरणीय शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नव्हते. राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने चालू असते. पक्ष फुटल्याचं तुम्ही खूपच जास्त मनाला लावून घेतलं आहे. त्यामुळं आता तुम्हाला तुमच्या घरातल्या सुना देखील परक्या वाटू लागल्या आहेत. शरद पवार यांचे वक्तव्य हे दुर्दैवी असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, अशा शब्दात विखेंनी पवारांवर टोला लगावला.






