डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले , लाडक्‍या बहिणींनी दिलेल्‍या उत्‍स्‍फुर्त प्रतिसादामुळे आमचे मन भरुन आले

0
52

मकर संक्रातीच्‍या सनाचे औचित्‍य साधून जनसेवा फौंडेशनच्‍या वतीने आयोजित करण्‍यात आलेल्‍या भव्‍य हळदी कुंकू समारंभातील लकी ड्रॉमध्‍ये शिर्डी येथील सौ.विजय सुरेश साळवे यांना यांनी सोन्‍याचा नेकलेस मिळविला तर, अन्‍य स्‍पर्धेमध्‍ये विजयी ठरलेल्‍या महीलांनाही आकर्षक बक्षिसे देण्‍यात आली. लाडक्‍या बहीणींसाठी आयोजित केलेला हा सोहळा केवळ कार्यक्रम नाही तर त्‍यांच्‍या सन्‍मानाचा उत्‍सव आहे. भविष्‍यातही अशा उपक्रमांचे आयोजन सातत्‍याने केले जाणार असल्‍याचे डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

जनसेवा फौंडेशनच्‍या वतीने शिर्डी येथील महिलांकरीता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यक्रमास डॉ.सुजय विखे पाटील सौ.शालिनीताई विखे पाटील, सौ.धनश्री विखे पाटील यांच्‍यासह महिला मोठ्या संख्‍येने उपस्थित होत्‍या हळदी कुंकू कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने महिलांसाठी काही स्‍पर्धांचेही आयोजन करण्‍यात आले होते. विजेत्‍या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्‍यात आली. स्‍पर्धेतील मुख्‍य आकर्षन असलेल्‍या सोन्‍याचा नेकलेस जिंकण्‍याचा मान सौ.विजया सुरेश साळवे यांनी मिळविला. छत्रपती शासन यांच्‍या सौजन्‍याने हे सर्वात महत्‍वपूर्ण बक्षिस प्रदान करण्‍यात आले. शिर्डी ग्रामस्‍थांच्‍या सहभागाने लाडक्‍या बहिणींचा हा सन्‍मान सोहळा दिमाखदार ठरला.

याप्रसंगी मनोगत व्‍यक्‍त करताना डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, लाडक्‍या बहिणींनी दिलेल्‍या उत्‍स्‍फुर्त प्रतिसादामुळे आमचे मन भरुन आले आहे. तुमच्‍या प्रेमाचे पाठबळ आणि‍ विश्‍वासावर विखे पाटील परिवाराची राजकीय, सामाजिक वाटचाल यशस्‍वी होत आहे. ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्‍यातही तुम्‍ही दिलेल्‍या योगदानाचा उल्‍लेख करुन, डॉ.सुजय विखे पाटील यांनी आभार मानताना हा स्‍नेह अखंड ठेवा अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.

सूत्रसंचालक संदिप पाटील यांच्‍या मिष्‍कील आणि उत्‍साहवर्धक अशा संभाषणाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली. या सोहळ्यात शिर्डी आणि पंचक्रोषितील महिला मोठ्या संख्‍येने सहभागी झाल्‍या होत्‍या.