नगर तालुक्यातील नागरदेवळे वडारवाडी व बाराबाभळी ग्रामपंचायत बरखास्त करून नगरपरिषद स्थापनेचा घाट घालत मोठ्या थाटात ५ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली परंतु नगरपंचायतची घोषणा होऊन तीन महिने उलटले तरीही अद्याप पर्यंत नगर पंचायत खात्यावर एक रुपयाचा निधी वर्ग झालेला नाही हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे.आ. तनपुरे यांनी स्वतःच्या राजकारणासाठी नागरदेवळे, बाराबाभळी व वडारवाडी ग्रामस्थांना वेटीस धरले आहे. निधी उपलब्ध नसल्यामुळे विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्यक्षात एकही जबाबदार अधिकारी नियुक्तीवर नव्हता परंतु माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून नागरिकांच्या दैनंदिन अडचणी प्रशासकीय समस्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी विविध अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती केली. आमदार तनपुरे व त्यांचे उत्साही कार्यकर्ते पदाधिकारी मात्र फक्त नगरपंचायत स्थापनेचा ढोल वाजवत मोठ्या विकास कामांची स्वप्ने दाखवण्यातच मशगुल राहिले व जनतेला वारेवार सोडले कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसल्यामुळे नागरदेवळे, वडारवाडी व बाराबाभळी गावातील विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिलेत असा आरोप मा. मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केला.
Home नगर जिल्हा शिवाजीराव कर्डिले यांचा आमदार तनपुरे यांना सवाल, नागरदेवळे नगर परिषदेला ५ कोटींच्या...