Home ब्रेकिंग न्यूज मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेचच चूक मान्य केली… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा!

मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेचच चूक मान्य केली… देवेंद्र फडणवीस यांचा मोठा खुलासा!

0
18

‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरुन दोन आठवड्यांआधी भाजप आणि शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. ही जाहिरातबाजी चूक असल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, ही जाहिरात चूक असल्याचं शिंदेंनी मान्य केल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

उत्तर देताना फडणवीसांनी आमच्यात कोणतेही वाद नाहीत. जाहिरात चुकीची गेली हे स्वत: मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. मी नेहमीच त्यांचा आदर करतो आणि ते सुद्धा मी उपमुख्यमंत्री आहे हे मला जाणवू देत नाहीत. आम्ही दोघांनी आमच्या मर्यादा पाळल्या आहेत. पक्षांमध्ये काही कमी डोक्याची लोकं असतात. मात्र, अशा लोकांमुळे सरकार पडेल असं कोणाला, विरोधी पक्षांना वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही एका मोठ्या ध्येयाने, खूप विचारांती हे सरकार बनवलं आहे. हे सरकार काही खुर्च्या उबवण्यासाठी नाही, असं फडणवीस म्हणाले.