Home ब्रेकिंग न्यूज शुभांगी पाटील ठाकरे गटात…शिवबंधन बांधले..

शुभांगी पाटील ठाकरे गटात…शिवबंधन बांधले..

0
22

नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांना कडवी झुंज देणाऱ्या शुभांगी पाटील यांनी आज अधिकृतरित्या ठाकरे गटात प्रवेश केला.

मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांनी हाती शिवबंधन बांधले. तसेच, आता खरी लढाई सुरू झाली आहे, असा सूचक इशाराही शुभांगी पाटील यांनी दिला आहे.

मातोश्रीबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना शुभांगी पाटील म्हणाल्या, मी 2 फेब्रुवारीलाच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज मी शिवबंधन हाती बांधले आहे.