Videoएकट्या म्हशीने दिली सिंहाला टक्कर,जंगलाच्या राजावर म्हशी भारी!

0
46

असं म्हणतात जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होते, असंच काहीसं या व्हिडीओमधून समोर आलेल आहे. एरवी वाघ, सिंहाच्या तावडीतून निसटणं तसं अवघड पण एका म्हशीने चक्क सिंहाला टक्कर दिली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,जंगलात दोन म्हशींच्या मागे शिकारीसाठी सिंह लागला आहे. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर एक म्हस उलटून सिंहालाच दम देताना दिसत आहे. एवढावेळ सिंहापासून बचावासाठी पळणारी म्हस अचानक उलटी फिरते आणि सिंहाला टक्कर देते. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.