Small Saving Schemes… पोस्टाची बचत योजना, किसान विकास पत्राच्या व्याजदरात वाढ

0
275

Small Saving Schemes

किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिसच्या बचत योजना ( आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजना यासह इतर स्मॉल सेव्हिंग योजनामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. अर्थ मंत्रालयाने आर्थिक वर्ष 2022-23 च्या तिसऱ्या तिमाहीसाठी बचत योजनांवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पण पीपीएफ सुकन्या समृद्धी योजना आणि एनएससी यावरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही.

किसान विकास पत्रवरील व्याज दरामध्ये 6.9 टक्क्यांवरुन सात टक्के वाढ करण्यात आली आहे. याआधी किसान विकास पत्रामधील गुंतवणूक 124 महिन्यानंततर मॅच्युअर होत होती. पण आता 123 महिन्यानंतर मॅच्युअर होईल.
ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनावरील व्याजदर 7.4 टक्क्यांवरुन 7.6 टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यावरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर 6.6 टक्क्यांवरुन 6.7 टक्के करण्यात आला आहे.
पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 5.5 टक्क्यांऐवजी 5.7 टक्के व्याज मिळणार आहे. तर तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवरील व्याजदर 5.5 टक्क्यांवरुन 5.8 टक्के करण्यात आले आहे. एक वर्षांच्या मुदत ठेव योजनावरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नाही. एक वर्षाच्या मुदत ठेव योजनावर 5.5 व्याज देण्यात येतेय. त्याप्रमाणेच पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनावरील व्याजदरातही कोणताही बदल करण्यात आला नाही. पाच वर्षांच्या मुदत ठेव योजनावर 5.8 टक्के व्याज मिळते.