केंद्रीय मंत्री आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री स्मृती ईरानी सध्या प्रचंड चर्चेत आहेत. स्मृती ईरानी आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आल्या आहेत. स्मृती ईरानींची मुलगी शनेल ईरानी नुकतंच लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर काल राजस्थानमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
स्मृती ईरानी यांची कन्या शनेल ईरानी काल राजीव भल्लासोबत लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील, नागौर याठिकाणी असलेल्या खिंवसर किल्ल्यात हे शाही लग्न पार पडलं. सध्या अनेक सेलिब्रेटी राजस्थानच्या शाही किल्यांमध्ये लग्न करण्याला पसंती देत असल्याचं दिसून येत आहे. गेल्यावर्षी अभिनेत्री कतरिना कैफने अशाच राजस्थानमधील एका प्रसिद्ध शाही पॅलेसमध्ये लग्न केलं होतं. तर नुकतंच कियारा अडवाणीनेसुद्धा असंच केलं आहे. कियारा राजस्थानच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नाच्याबेडीत अडकली आहे. आता स्मृती ईरानीच्या लेकीचं लग्नदेखील अशाच शाही पॅलेसमध्ये पार पडलं आहे.