सर्पदंश झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी चक्क रुग्णालयात अघोरी विद्येचा वापर Video

    0
    68

    महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातून एक विचित्र घटना व्हिडीओद्वारे समोर आली आहे. त्यानुसार एका व्यक्तीला साप चावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अंधश्रद्धेतून काही लोक रुग्णालयातच अघोरी विद्येने रुग्णावर उपचार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यामुळे उपचारांसाठी आता त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.