मंगळवार-बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रयागराजच्या संगम किनाऱ्यावर भीषण चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 14 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 50 हून अधिक जखमी आहेत. 14 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणण्यात आले आहेत. मात्र, मृत किंवा जखमींची संख्या याबाबत प्रशासनाने कोणतीही माहिती दिलेली नाही.
महाकुंभमेळ्यात अमृत स्नानासाठी अनेक भाविक आले होते. ही गर्दी खूपच जास्त होती. त्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत १० जण मृत्यूमुखी तर अनेकजण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या ठिकाणी पोलिसांनी भाविकांना मदत केली आहे. सध्या महाकुंभमेळ्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे तर सर्व आखाड्यांनी अमृत स्नानावर बंदी घातली आहे. त्यामुळे आज अमृत स्नान होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
महाकुंभमेळ्यात गर्दी खूप जास्त झाली होती. त्यामुळे भाविकांना श्वास घ्यायलाही त्रास होत होता. त्यामुळे ढकलाढकली सुरु झाली. यामुळे काही भाविकांना बॅरेकेडिंग तोडले. यामुळे गर्दीतील लोक इकडे तिकडे पळत होते. यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले आहेत.
महाकुंभमेळ्यात जगातील कानाकोपऱ्यातून अनेक लोक येतात. आज नागा साधूंचा दुसरा अमृत स्नान विधी होती. त्यामुळे आज १० कोटी भाविक येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, चेंगराचेंगरीची घटना घडल्याने अमृत स्नान कार्यक्रम रद्द करण्यात आली आहे. आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नसल्याचे जाहीर केले आहे.






