*खंडाळा येथील १०-१५ एकर उस आगीत भस्मसात*
Sugarcane fire
श्रीरामपूर- आज दि २८/३/२२(सोमवार) दुपारी शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जवळपास १०-१५ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला.या घटनेचा गावातील शेतकऱ्यांना फटका बसला आहे. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील शेतकरी श्री अरविंद डेंगळे,श्री अप्पासाहेब म्हसे,श्री एस शर्मा,श्री परसराम डेंगळे यांच्या उसाला आग लागली.हा हा म्हणता या आगीने उग्ररूप धारण केले.या शेतकऱ्यांचा १०-१५ एकर क्षेत्रातील ऊस जागेवरच जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच गणेशनगर येथील गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाला.मात्र, वाऱ्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली.त्यातच अग्निशमन बंबास शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता न मिळाल्यामुळे मदतकार्यात अडथळे आले.त्यामुळे हानी आणखीच वाढत राहिली. शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचे स्पष्ट झाले असल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी,अशी मागणी केली आहे.शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण याच महिन्यातच येथेही आगीची घटना घडली होती.त्यात सुमारे १०-१५ एकर उसाच्या क्षेत्राची हानी झाली होती. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा अशीच घटना घडली. त्यात मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरणच्या देखभाल शून्यनतेने वीज वितरणामध्ये अडथळा तयार होतो आणि शॉर्टसर्किट वारंवार घडते,उन्हाच्या तीव्रतेमुळे त्याचं रूपांतर आगीत होत.यावर्षीशी उस क्षेत्र जास्त शिल्लक असल्यामुळे याचा फटका घटनेच्या ठिकाणी असणाऱ्या
अनेक शेतकऱ्यांच्या मोठ्या क्षेत्राला बसतो,त्यात अनेक शेतकरी आर्थिक दृष्ट्या होरपळून निघतात.याची तांत्रिक चौकशी झाली पाहिजे व ऑडिट देखील झालं पाहिजे.
*श्री मदन चौधरी*
(उपाध्यक्ष,भाजप किसान आघाडी उत्तर नगर जिल्हा)