नगर जिल्हयात वाढत्या जातीय दंगली,जातीय तेढ…खा. सुजय विखे म्हणाले…व्हिडिओ

0
27

वाढत्या जातीय दंगली आणि जातीय तेढ याच्यापार्श्वभूमीवर सायबर सिक्युरिटीवर भर देणं गरजेचं असल्याचे मत भाजप खासदार सुजय विखेंनी व्यक्त केलं आहे…दंगलीच्या घटना या शक्यतो मिरवणुकांच्या वेळी घडतात अशा मिरवणुकांच्या आधी एक दोन दिवस आपण जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जातीय तेढ निर्माण करणारे संदेश पसरवले जातात त्यामुळे अशा काळात नेटवर्क किंवा इंटरनेट बंद कसं ठेवता येईल तसेच अशा तेढ निर्माण करणाऱ्या संदेशांवर लक्ष ठेवण्यासाठी आपली सायबर सिक्युरिटी अधिक मजबूत कशी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे…त्यासाठी पालकमंत्र्यांची आणि पोलिसांची बैठक झाली आहे सध्या अहमदनगर पोलीस सायबर सिक्युरिटीसाठी तेवढे सक्षम नाहीत मात्र त्यांना सक्षम करण्यासाठी लवकरच अडीच ते तीन कोटींचा निधी दिला जाईल असं खासदार सुजय विखे यांनी म्हंटलंय.