यंदा आषाढीची शासकीय महापूजा कोण करणार? खा. डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले….

0
1377

ताहाराबाद (ता राहुरी)येथे श्री महिपती महाराज देवस्थान ट्रस्टच्या श्री क्षेत्र ताहाराबाद ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्तान व श्री संत कवी महिपती महाराज पालखीचे पूजन खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र साबळे,उपाध्यक्ष अविनाश कांबळे ,भाजपचे जेष्ठ नेते आसाराम धुस,दिंडी प्रमुख हभप नाना महाराज गागरे,सरपंच नारायण झावरे,चांगदेव किंनकर,माजी सभापती भीमराज हारदे,डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर करखान्याचे सर्व संचालक ,माजी सभापती मनीषा ओहळ ,राहुरी तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी व सह सर्व ट्रस्ट चे सदस्य ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच पालखी रोड चे भूमिपूजन खासदार डॉ विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “पंढरीचा पांडुरंग नेहमी योग्य माणसाला आषाढीच्या पूजेसाठी बोलावत असतो. यावर्षीही योग्य माणसाच्या हस्तेच पंढरीच्या पांडुरंगाची पूजा होईल. याबाबत सर्वांनी निश्चिंत राहावे. हे ठरवणारे आपण नाही तर पांडुरंगच आहे,” असे सांगत त्यांनी महाराष्ट्रात सत्तांतराचे संकेत दिले.