Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल Tata Stryder ZEETA PLUS इलेक्ट्रिक सायकल लाँच…दमदार बॅटरी आणि उत्तम लुक

Tata Stryder ZEETA PLUS इलेक्ट्रिक सायकल लाँच…दमदार बॅटरी आणि उत्तम लुक

0
31

Tata Stryder ZEETA PLUS टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या स्ट्रायडर या कंपनीने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी एक नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे, या इलेक्ट्रिक सायकलचे नाव Zeeta Plus आहे. इलेक्ट्रिक सायकलची किंमत 26 हजार 995 आहे. ही सायकल मर्यादित काळासाठी या किमतीत विकली जाईल. यानंतर या बाइकची किंमत जवळपास 6 हजार रुपयांनी वाढू शकते. झीटा प्लस या इलेक्ट्रिक सायकलसोबत उच्च दर्जाची, म्हणजेच 36-volt/6 Ah क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 216 Wh एवढी पॉवर जनरेट करते, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच, एकदा चार्ज केल्यानंतर ही सायकल जवळपास 30 किलोमीटर पर्यंत रेंज देऊ शकते आणि पॅडल न मारता जास्तीत जास्त 25 किलोमीटर प्रतितास वेगाने चालू शकते. सायकलची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तास लागतील.