चहा पावडर अनेक प्रकारे वापरता येतात. चहा पावडर चहामध्ये टाकून उकळवली जातात आणि चहा गाळल्यानंतर ती थेट कचऱ्यात टाकली जाते. पण, निरुपयोगी समजली जाणारी ही उकळवलेली चहा पावाडरही अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते. चहा उकळवल्यानंतर उरलेली चहा पावडर जंतुनाशक म्हणून वापरली जाऊ शकते. यासाठी चहा पावडर धुवून बाटलीत भरून त्यात पाणी घाला. नीट ढवळून झाल्यावर हे पाणी लाकडी फरशीवर, लाकडी फळीवर किंवा ड्रॉवर इत्यादींवर शिंपडता येते. यामुळे लाकडी वस्तूही स्वच्छ होतात आणि त्यावर जंतू येत नाहीत.
या चहा पावडरचा वापर वनस्पतींमध्ये खत म्हणूनही करता येतो. चहा पावडर धुतल्यानंतर थेट झाडांच्या मातीत मिसळा. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते आणि झाडे हिरवीगार व बहरलेली राहतात.
उकळलेली चहा पावडर एका भांड्यात ठेवा आणि त्यात आवश्यक तेलाचे काही थेंब घाला. हे कॅबिनेटमध्ये सुगंध पसरवेल आणि अतिरिक्त ओलावा देखील काढून टाकेल. हे लक्षात ठेवा की, तुम्ही दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ही चहा पावडर बदलत राहा.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल चहा गाळल्यानंतर उरलेली चहा पावडर फेकून देताय? असा वापर केल्यास मिळतील...