हा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर समोर आला आहे. यात एक मूल शिक्षकाकडे बघताना दिसत आहे. शिक्षक आधी त्याला विचारतात की 5 पैकी 5 गेले तर किती शिल्लक राहील. त्यानंतर मूल उत्तर माहित नसल्याचं सांगतं. मग शिक्षक हा प्रश्न सुधारतो आणि विचारतो की तुमच्याकडे पाच भटूरे असतील ते पाच जर आम्ही घेतले असतील तर तुमच्याकडे काय शिल्लक राहील. यांनतर तो मुलगा चपखलपणे सांगतो भटुरे घेतल्यावर माझ्याकडे छोले शिल्लक राहतात. एवढं बोलून तो स्वत: हसू लागतो आणि त्याचं उत्तर ऐकून वर्गात उपस्थित मुलं हसू लागतात, तसेच टाळ्याही वाजवू लागतात.
बहुत ही रोचक उत्तर मिला…😀😀 pic.twitter.com/cI7dS4UFXq
— Hasna Zaroori Hai 🇮🇳 (@HasnaZarooriHai) July 7, 2023