तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. यामध्ये महमूद अली हे त्यांच्या अंगरक्षकाच्या कानशीलात लगावताना दिसत आहेत. महमूद अली हे तेलंगणाचे पशूसंवर्धन मंत्री श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गेले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी एका क्षुल्लक कारणावरून त्यांच्या अंगरक्षकाच्या कानशीलात लगावली.
या व्हायरल व्हिडीओत दिसतंय की, गृहमंत्री महमूद अली यांनी श्रीनिवास यादव यांना मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पुष्पगुच्छ घेण्यासाठी ते त्यांच्या अंगरक्षकाकडे वळले आणि त्याच्या दिशेने हात केला. तेवढ्यात अंगरक्षक त्यांच्याजवळ आला. अंगरक्षकाच्या हातात पुष्पगुच्छ नसल्याने महमूद संतापले आणि त्यांनी अंगरक्षकाच्या कानशीलात लगावली.
https://x.com/Arvindharmapuri/status/1710206212078501907?s=20