राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार? आ. संग्राम जगताप यांना लवकरच मंत्रीपदाची संधी

0
17

अहमदनगर-राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्यार असल्याचं सुतोवाच राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केलं असून ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्यार असल्याचं सुतोवाच राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केलं असून ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते. तर नगर शहराचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना लवकरच मंत्रीपदाची संधी मिळेल असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे. तसंच राज्यात लोकसभा निवडणुकीत 45 प्लसचं लक्ष्य ठेवून २०२४ ला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी महायुती काम करत आहे, असंही ते म्हणाले आहेत.