काय सांगता! चक्क तिसऱ्या दिवशी मूल रांगायला लागलं…व्हायरल Video

0
25

सध्या सोशल मीडियावर अशाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केवळ तीन दिवसांची नवजात मुलगी हॉस्पिटलमधील कॉटवर रांगताना दिसत आहे. या मुलीला रांगाताना पाहून तिच्या आई देखील आश्चर्यचकित झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील मुलीच्या आईचे नाव सामंथा मिशेल आहे, तर मुलीचे नाव नायला असं आहे. सामंथा यांनी जेव्हा आपल्या तीन दिवसांच्या मुलीने शरीराला आधार देण्यासाठी आपले हात बाहेर काढल्याचं आणि डोके वर उचलल्यांच पाहिलं तेव्हा त्यांना धक्का बसला. व्हाईट ओक, पेनसिल्व्हेनिया येथे राहणाऱ्या सामंथा यांनी आपल्या मुलीचा रांगतानाचा व्हिडीओ शूट केला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.