Video: जंगल सफारी करताना गाडीसमोर आला सिंह अन् पुढे जे घडलं…

0
25

जंगल सफारी करायला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. सफारी करणारी व्यक्ती वेळ मिळाला की, सर्वात पहिले त्याला आवडणाऱ्या जंगलाची सफारी करण्यासाठी निघतात व जंगलातील विविध प्राण्यांचे फोटो काढताना दिसतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. येथे जंगलात वाईल्ड लाईफ फोटोग्राफरचा सिंहाशी सामना झाला आहे. तर या परिस्थितीचा सामना फोटोग्राफरने कसा केला चला पाहू.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर जंगल सफारीचा आनंद घेत होता. जंगलाच्या मधोमध फोटोग्राफर फोटो क्लिक करण्यासाठी गाडीच्या बॉनेटवर बसलेला दिसतो आहे. तितक्यात जंगलातून सिंहाची एंट्री होते. सिंह आणि फोटोग्राफर एकमेकांकडे पाहत असतात. फोटाग्राफर कोणतीही हालचाल करत नाही व सिंहदेखील हे पाहतो आणि आपल्याला काही धोका नाही हे समजताच गुपचूप तिथून निघून जातो.