टोमॅटोचे द्विशतक, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय…

0
29

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजार समित्यांमधून तत्काळ टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. खरेदी केलेला टोमॅटो दिल्ली आणि परिसरातील विक्री केंद्रातून सवलतीच्या दराने विकला जाणार आहे. शुक्रवार, १४ जूनपासून दिल्लीत सवलतीच्या दराने टोमॅटो विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रात आणखी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.