Toyota Innova Crysta… लोकप्रिय आलिशान गाडी लाँचींगच्या तयारीत…बुकींग सुरु

0
27

Toyota Innova Crysta टोयोटा मोटर लवकरच इनोव्हा क्रिस्टा MPV ला नवं डिझाईन, फिचर्स आणि नव्या इंजिनसह पुन्हा एकदा लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने इनोव्हा क्रिस्टाचं बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. नव्या लूकमधील इनोव्हाला 50 हजारांचं टोकन देत बूक करु शकतो.

टोयोटा मोटरने आतापर्यंत इनोव्हा क्रिस्टा 2023 मॉडेली किंमत जाहीर केलेली नाही. पुढील महिन्यात ही कार अधिकृतपणे लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी इनोव्हाचं डिझेल इंजिन बंद करुन एका हायब्रिड इंजिनसह लाँच केलं होतं. आता कंपनी पुन्हा एकदा डिझेल इंजिन आणण्याच्या तयारीत आहे.

नव्या अवतारात येणाऱ्या इनोव्हा क्रिस्टाच्या डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. कारचा फ्रंट लूक बदलण्यात आला आहे. तसंच जुन्या इनोव्हा क्रिस्टाच्या तुलनेत जास्त भक्कम असेल. या फॅमिली कारचा नवा लूक एसयुव्ही फॉर्च्यूनरच्या फ्रंट लूकप्रमाणे आहे.

<strong>‘वेड लावलय’ गाण्यावर चिमुरडी मायरा उर्फ परी आईसह थिरकली… व्हिडिओ

advt