सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ बनारसचा आहे. व्हिडिओ बनारसमधील एका रेल्वे फाटकाजवळचा आहे, जिथे जाममुळे चक्क ट्रेन थांबवावी लागली. याठिकाणी रेल्वे फाटक उघडल्यानंतर एवढी वाहनं एका बाजूने दुसरीकडे जाऊ लागली की मोठी कोंडी झाली. असंही बोललं जात आहे, की ट्रेन आल्यानंतर बंद होणाऱ्या गेटमध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा.
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की रेल्वे ट्रॅकवर अनेक वाहने जाममध्ये अडकलेली आहेत. तिथे वाहनांची इतकी गर्दी आहे, की यामुळे या ट्रॅकवरून जाणारी ट्रेन थांबवावी लागली. यावेळी फक्त वाहनंच ट्रॅकवरुन जाताना दिसली.
India is not for the beginners 🤣😂 pic.twitter.com/sSFLZWS3BK
— BALA (@erbmjha) August 13, 2023