सध्या सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अत्याधुनिक स्मार्टफोन्स आणि स्वस्त इंटरनेट यांमुळे सोशल मीडियावर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आजकाल प्रत्येकजण इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर अशा साइट्सवर सक्रिय असतो. खासकरुन तरुण मंडळी सोशल मीडियाचा जास्त वापर करताना दिसतात. गायन, नृत्य यांच्यासह चित्रकला, हस्तकला अशा कला अंगी असणाऱ्यांसाठी सोशल मीडियाची मोठी मदत होते. त्यांना आपली कला जास्तीत जास्त लोकांना पोहचण्याची संधी मिळते.
पण त्याच बाजूला या माध्यमावर चित्रविचित्र गोष्टी करुन व्हायरल होणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचेही पाहायला मिळते. व्हायरल होऊन फेमस होता यावे या एका ध्येयासाठी लोक वाटेल ते करायला तयार असतात. प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेले हेच प्रयत्न काही वेळेस त्यांच्या जीवावर बेततात. व्हिडीओ बनवण्यासाठी रेल्वे रुळाजवळ गेलेल्या एका मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
https://twitter.com/bigroy1922/status/1653400385237708801?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1653400385237708801%7Ctwgr%5E546566fff6bf84cee0a4ab2b4b3a9e0171608284%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Ftrending%2Fviral-video-train-accident-boy-hit-by-train-during-recording-reel-yps-99-3639773%2F