लग्न समारंभात तर कोणी भररस्त्यात नाचताना आपणाला पाहायला मिळतं. पण व्हायरल होणारे सर्वच व्हिडीओ नेटकऱ्यांना भावतात असं नाही. कारण काही मोजकेच व्हिडीओ असे असतात जे नेटकऱ्यांना मनापासून आवडतात, सध्या सोशल मीडियावर असाच एक लहान मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो नेटकऱ्यांना खूप आवडला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडीओ नैनितालमधील नैना देवी मंदिराच्या परिसरातील असून यामध्ये एक लहान मुलगी अतिशय सुंदर आणि मनमोहक डान्स करताना दिसत आहे. दिविशा सिंग नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ आतापर्यंत हा व्हिडीओ ९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर त्याला १ लाख ४७ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.