नारळपाणी विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य… संतापजनक Video

0
16

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक नारळपाणी विक्रेता नारळावर नाल्यातील पाणी शिंपडताना दिसत आहे. एका निवासी सोसायटीबाहेरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, तसंच हा लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार असल्याचंही नेटकरी म्हणत आहे.

व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच, पोलिसांनी या घटनेची चौकशी करुन त्या नारळपाणी विक्रेत्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ ग्रेटर नोएडा वेस्ट येथील राधा स्काय गार्डन सोसायटीजवळचा आहे. व्हिडीओमध्ये, एक नारळपाणी विकणारा तरुण नाल्यातील पाणी विक्रीसाठी ठेवलेल्या नारळावर शिंपडताना दिसत आहे. नारळपाणी विक्रेत्याच्या या किळसवाण्या कृत्याचा व्हिडीओ काही लोकांनी शूट केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.