TVS Ronin
भारताचा माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीला बाइक्सचं जबरदस्त वेड आहे. धोनीच्या कलेक्शन मध्ये एकापेक्षा एक लग्झरी गाड्यांचा आणि महागड्या बाइक्सचा समावेश आहे. आता महेंद्र सिंह धोनीने टीव्हीएस मोटर्सची आणखी एक स्वस्त बाइक खरेदी केली आहे. धोनीने नुकतीच टीव्हीएस मोटर्सकडून नियो-रेट्रो स्क्रँबलर बाइक TVSची डिलिव्हरी घेतली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात कंपनीने या बाइकला लाँच केले होते. टीव्हीएस मोटर कंपनीचे बिझनेस हेड विमल संबली यांनी महेंद्र सिंह धोनीला या बाइकची चावी सुपूर्द केली आहे. तसेच हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
TVS Ronin बाइक मध्ये ३१ मिमीचे अपसाइड डाउन फ्रंट फोर्क्स सस्पेंशन दिले आहे. जे आधीच्या तुलनेत प्री लोडेड एडजस्टेबल मोनोशॉक यूनिट मिळते. १७ इंचाचा अलॉय व्हीलने सजवलेल्या या बाइकमध्ये ड्युअल पर्पज टायर मिळते. या बाइकमध्ये TVS SmartXonnect ब्लूटूथ कनेक्टिविटी सोबत संपूर्ण डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर दिले आहे.
TVS Ronin बाइक मध्ये ब्लूटूथ कनेक्टिविटी सोबत एक ऑल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, व्हाइस असिस्टेंस, अर्बन आणि रेन राइड मोड्स, मेसेज आणि कॉल अलर्ट फंक्शन, स्लिपर आणि असिस्ट क्लच, सायलेंटसाठी एक इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर सिस्टम मिळते.
इंडियन मार्केटमध्ये या बाइकची किंमत १.४९ लाख ते १.७१ लाख रुपयांपर्यंत आहे.