सध्या देशभरातील तरुणाईमध्ये आयपीएलची क्रेझ दिसून येत आहे. आपल्या देशातील लोकांना आयपीएलचं वेड किती आहे हे सांगण्याची गरज नाही. शिवाय अनेक क्रिकेटप्रेमी आयपीएलचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जातात. शिवाय स्टेडियममध्ये मॅच पाहायला जाणारे क्रिकेट चाहते आपल्या आवडत्या टीमला समर्थन देण्यासाठी हातात वेगवेगळे पोस्टर्स घेऊन जात असतात. सध्या अशाच एका तरुणाने स्टेडियममध्ये नेलेल्या पोस्टरची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. हो कारण लखनऊमध्ये सुरू असलेल्या मॅचदरम्यान स्टेडियममधील एका तरुणाच्या हातातील पोस्टर पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या तरुणाने आपल्या हातातील पोस्टरद्वारे मुलीच्या पालकांना अनोखं आवाहन केल्याचं पाहायला मिळत आहे.
स्टेडियममधील व्हायरल होत असेल्या व्हिडीओमध्ये, एक तरुण क्रिकेटचा सामना सुरु असताना स्टेडियमच्या मध्यभागी आपल्या सीटवर उभा असल्याचं दिसत आहे. या तरुणाच्या हातातील पोस्टरवर मोठ्या अक्षरात लिहिले आहे, “लग्नासाठी सरकारी नवरा शोधणे बंद करा, बेरोजगारी.” या तरुणाने केलेले अनोखे कॅमेऱ्यात कैद झाले आणि तो स्क्रीनवर झळकला. त्यामुळे त्याच्या या पोस्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर त्याने मुलीच्या पालकांना तरुणाने केलेलं आवाहन पाहून अनेकजण त्याचे कौतुक करत आहेत.
Home Featured अर्थकारण/लाईफस्टाईल लग्नासाठी सरकारी नवरा…बेरोजगार तरुणाने मुलींच्या पालकांना पोस्टरद्वारे केलं आवाहन व्हिडीओ