ग्राहकाभिमुख सेवा देण्यात युनियन बँक अग्रेसर : पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
प्रवरानगर शाखेचे नवीन कार्यालयात स्थलांतर
नगर : राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अग्रगण्य असलेली युनियन बँक ऑफ इंडिया नगर जिल्ह्यात ग्राहकाभिमुख सेवा देण्यात अग्रेसर असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
बँकेच्या प्रवरानगर शाखेचे नवीन सुसज्ज जागेत स्थलांतर व लोकार्पण सोहळा ना. विखे पाटील यांचे शुभहस्ते नुकताच संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, युनियन बँकेचे अंचल प्रमुख नवीन जैन, क्षेत्र प्रमुख सुनील कुमार यादव, उपक्षेत्र प्रमुख सुभाष गजभिये, शाखाधिकारी अमोल जाधव तसेच बँक अधिकारी, कर्मचारी व मान्यवर ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंचल प्रमुख नवीन जैन यांनी बँकेच्या विविध कर्ज योजना, बचत ठेव योजना तसेच अधिकाधिक ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी बँकेचे विविध उपक्रम याबाबत उपस्थितांना माहिती दिली. नव्या प्रशस्त शाखेच्या माध्यमातून शेतकरी, उद्योजक, व्यापारी, महिला, विद्यार्थी, नोकरदार तसेच समाजातील अन्य घटकांना तत्पर अर्थ सेवा उपलब्ध होणार असल्याचे यावेळी श्री यादव यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते काही मंजूर कर्जांचे वितरण करण्यात आले.






