उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारमधील कुरबुरी समोर येत आहेत. योगी सरकार मधील राज्यमंत्री दिनेश खटीक यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राजभवनला पाठवला आहे. दिनेश खटीक यांनी सांगितले की, अनुसूचित जातीमधील असल्याने त्यांच्या खात्यात कोणतीच सुनावणी होत नाही. इतकंच काय, त्यांना कोणत्याही बैठकीची माहिती दिली जात नाही. राज्यमंत्री म्हणून एक कार दिली आहे. मात्र, खात्यातील निर्णयाबाबत काहीच अधिकार दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. खटीक यांनी बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे.