UPSC
छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विट करून सांगितले की, भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांना दहावीत फक्त पासिंग गुण मिळाले आहेत. तुषार सुमेरा यांना दहावीत असताना इंग्रजीत ३५, गणितात ३६ आणि विज्ञानात ३८ गुण मिळाले होते. तुषार सुमेरा यांचा निकाल पाहून संपूर्ण गावात, ते काहीच करू शकत नाही असे बोलले जात होते. पण तुषार यांनी मेहनत करून असं स्थान मिळवलं की निंदा करणाऱ्यांची बोलतीच बंद झाली.
आयएएस अवनीश शरण यांच्या या ट्विटवर भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी ‘धन्यवाद सर’ लिहून त्यांना उत्तर दिले आहे. त्याच वेळी, या पोस्टवर आपला अभिप्राय शेअर करताना, अनेक युजर्सनी लिहिले आहे की “पदवी नाही, प्रतिभा महत्त्वाची आहे.” त्याच वेळी, कोणीतरी लिहिले – “आपले मार्क, ग्रेड किंवा रँक आपली क्षमता ठरवत नाही.”
तुषार सुमेरा हे सध्या भरूच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी आहेत. २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून ते आयएएस अधिकारी बनले.
भरूच के कलेक्टर तुषार सुमेरा ने अपनी दसवीं की मार्कशीट शेयर करते हुए लिखा है कि उन्हें दसवीं में सिर्फ पासिंग मार्क्स आए थे.
उनके 100 में अंग्रेजी में 35, गणित में 36 और विज्ञान में 38 नंबर आए थे. ना सिर्फ पूरे गांव में बल्कि उस स्कूल में यह कहा गया कि यह कुछ नहीं कर सकते. pic.twitter.com/uzjKtcU02I
— Awanish Sharan (@AwanishSharan) June 11, 2022







Rohan tukaram agarkar
Comments are closed.