अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरण अहमदनगरमधील प्रतिष्ठित डॉक्टरला अटक

0
15

अर्बन बँक कर्ज फसवणूक प्रकरणी डॉ. निलेश विश्वास शेळके याला सोमवारी दुपारी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. आरोपीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात 2022 मध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.उपअधीक्षक भारती हे तपास करीत आहे. आरोपीला अटक करू नये यासाठी अनेकांनी मध्यस्थी केली पण तपासी अधिकारी यांनी ती धुडकावून अटक केली या प्रकरणातील यापूर्वी अटक केलेले पंधरा ते सोळा जण जेलमध्ये आहेत डॉ निलेश शेळके याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या अधिपत्याखाली नगर अर्बन बँकेचे कामकाज सुरू होते. त्यांच्या अधिपत्याखालील संचालक मंडळाने गैरकारभार केला होता. त्यामुळे बँकेची चौकशी व्हावी, अशी मागणी बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्यासह पोपट लोढा, अच्युत पितळे, राजेंद्र चोपडा यांनी केली होती.

शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेला त्यांच्या काळात घरघर लागल्याचे बोलले जात होते. बँकेचा कारभार मनमानी पद्धतीने हाकल्यामुळेच बँक डबघाईला गेली. आता बँक बंद झाली असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.