हळदीचा टॉयलेटमध्ये वापर करण्याचा मोठा फायदा आहे. याचा परिणाम पाहून तुम्ही थक्क व्हाल. एकदा परिणाम पाहिला की तुम्हीही हळद नेहमी टॉयलेटमध्ये वापराल. व्हिडीओत पाहू शकता गृहिणीने एका भांड्यात हळद घेतली आहे. त्यात तिने लसणीच्या पाकळ्या किसून टाकल्या आहेत. यात पाणी मिक्स केलं. एक प्रकारचं सोल्युशन तिनं तयार केलं, ते तिने बाटलीत भरलं. हे मिश्रण तिने टॉयलेटमध्ये ओतलं आहे. त्यानंतर ब्रशने टॉयलेट घासलं आहे आणि चांगलं पाणी ओतून टॉयलेट स्वच्छ करून घेतलं आहे. यानंतर टॉयलेटच्या तळाशी राहिलेलं हळदीचं पाणी फ्लश करून घ्या.
हळद आणि लसणीचं हे मिश्रण टॉयलेट क्लिनरसारखं काम करतं. यामुळे टॉयलेट स्वच्छ होतं, टॉयलेटमधील बॅक्टेरियांचा नाश होतो, शिवाय टॉयलेटमधून दुर्गंधीही येत नाही, असा दावा या महिलेने केला आहे.