भाजपमध्ये तुफान राडा..मंत्र्यांसमोरच आमदार व पदाधिकारी भिडले..जोरदार हाणामारी..व्हिडिओ

0
1643

उत्तर प्रदेशमध्ये मंत्र्यांसमोरच भाजपाचे आमदार आणि पदाधिकारी एकमेकांना भिडले. लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. गुरुवारी रात्री मुरादाबाद सर्किट हाऊस येथे राज्याचे मंत्री जितिन प्रसाद यांच्या उपस्थितीत, काही लोकांनी भाजपा मागासवर्गीय मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य मनमोहन सैनी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
सर्किट हाऊसमध्ये मंत्री जितिन प्रसाद यांच्या भेटीत मनमोहन सैनी आणि शहराचे आमदार रितेश गुप्ता यांच्यात वाद झाला होता. हा वाद टोकाला गेला. भाजपाचे काही कार्यकर्ते आमदाराला रोखण्यासाठी देखील पुढे आले. शेवटी कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत परिस्थिती एवढी बिघडली की, आमदारामुळे मंत्र्यांना सभा अर्धवट सोडून उठावे लागले. सभेतील या वादानंतर काही वेळातच सर्किट हाऊसमध्ये मनमोहन सैनी यांना मारहाण करण्यात आली. यावेळी सर्किट हाऊसमध्ये मंत्रीही उपस्थित होते.