हिंदी टेलिव्हिजन विश्वाला धक्का देणारी बातमी इंदोरमधून येऊन धडकली आहे. ‘सुसरल सिमर का’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने हे टोकाचं पाऊल उचललं आणि टेलिव्हिजन विश्व हादरुन गेलं. वयाच्या २९ व्या वर्षी तिने जीवन संपवले. अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली असताना तिची एक जुनी पोस्ट चर्चेत आली आहे. वैशालीला सुशांतसिंह राजपूतच्या जाण्यााने मोठा धक्का बसला होता.
तिचा जन्म १५ जुलै १९९३ रोजी झाला होता. तिने स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून टेलिव्हिजन विश्वात पदार्पण केले होते. या मालिकेत तिच्या पात्राचे नाव संजना होते, यामध्ये तिने २०१५ ते २०१६ या कालावधीमध्ये काम केले. याशिवाय वैशालीने ‘ये है आशिकी’ या मालिकेत वृंदाची भूमिका साकारली होती. वैशाली ठक्कर हिने २०१६ आणि २०१७ मध्ये कलर्स टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘ससुराल सिमर का’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती.