वाराणसी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणमध्ये तिसऱ्या दिवशी शिवलिंग सापडले आहे. त्यानंतर कोर्टाने जिथे शिवलिंग सापडले ती जागा सील करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने एका याचिकाकर्त्याच्या अर्जानंतर हे आदेश दिले आहेत. ज्ञानवापी परिसराच्या सर्वेक्षणाचा आज तिसरा दिवस आहे. सर्वेक्षणाच्या नंतर हिंदू पक्षकारांच्या बाजूने असलेले डॉ. सोहनलाल यांनी मोठा दावा केला आहे, ते म्हणाले की, आतमध्ये शिवलिंग सापडले आहे. आत्तापर्यंत आत जे शोधण्यात येतं आहे. त्यापेक्षा जास्त सापडण्याची शक्यता आहे. आता पश्चिमच्या भिंतीच्या जवळ 75 फूट उंच, 30 फूट रुंद आणि 15 फूट लांब छिगारा आहे, त्याचा सर्वे करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात मुस्लीम पक्षकारांची सुनावणी मंगळवारी होणार आहे. त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
रविवारी आणि सोमवारी या मशिदीची पाहणी कडक सुरक्षेत सकाळी आठ ते दुपारी बारापर्यंत केली गेली. याविषयी वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले की, न्यायालयाने नियुक्त केलेल्या तीन विधि आयुक्तांसह सर्व पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश आलेल्या न्यायालयीन आयोगाने सकाळी आठला ही पाहणी सुरू केली होती.