म्हणून मी दोन लग्न करणार… नव्या नवरीचा पोलिसांसमोर धिंगाणा व्हिडिओ

0
38

जर एखादी व्यक्ती दुसऱ्यावर प्रेम करत असेल, परंतु बळजबरीने दुसऱ्याच व्यक्तीसोबत लग्न लावून दिलं गेलं, तर अनेकदा नंतर मोठा गोंधळ होतो. असाच एक प्रकार पोलीस ठाण्यात घडला. नवविवाहित वधूने प्रियकराशी लग्न करण्याची मागणी करत हायव्होल्टेज ड्रामा केला. प्रियकराशी लग्न करण्याच्या हट्टावरून नवविवाहितेने पोलीस ठाण्यात गोंधळ घातला.
लाल आणि सोनेरी रंगाची साडी परिधान केलेल्या नववधूने पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये, वधू ओरडताना ऐकू येते – दो शादी करेंगे, दो शादी. महिला पोलीस अधिकारी तिला रोखण्याचा प्रयत्न करत असताना वधू कागदपत्रं आणि मोबाईल फेकताना दिसते. व्हिडिओ संपण्यापूर्वी एक महिला कॉन्स्टेबल तिला एका खोलीत घेऊन जाते.