भारताचा फिरकी गोलंदाज यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चहलचा चेंडू टप्पा पडताच इतका फिरला की फलंदाजाला काही कळायच्या आत ऑफ स्टंप उडवून गेला. चहलचा चेंडू शेन वॉर्नसारखाच फिरला. जेव्हा शेन वॉर्न गोलंदाजी करायचा त्यावेळी देखील त्याच्या फिरकीचा सामना करायला फलंदाज थरथर कापयचे.
युजवेंद्र चहल हा आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. पहिल्याच डावात त्याने केंट संघासाठी आपला पहिला विकेट घेतला आहे. नॉटिंघमशायर संघाविरूद्धच्या सामन्यात दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत २० षटके टाकून ३ गडी बाद केले आहेत.